Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयात विविध उपक्रमांनी साजरा होणार माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचा वाढदिवस

एमपीसी न्यूज – मावळभूषण, शिक्षण महर्षी, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त (Talegaon Dabhade) गुरुवारी (दि. 10) इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांच्या विशेष प्रयत्नातून इंद्रायणी महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. निबंध, वक्तृत्व स्पर्धा, वृक्षारोपण, रुग्णांना फळवाटप असे अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे यांनी दिली.

इंद्रायणी महाविद्यालयातील कनिष्ठ, वरिष्ठ, तंत्रशिक्षण, बीबीए, बीसीए तसेच डी फार्मसी, बी फार्मसी या विभागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधण्याच्या हेतूने आणि माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या कर्तृत्व संपन्न आणि विचार संपन्न व्यक्तिमत्वाचा परिचय नव्या पिढीला व्हावा या उद्देशाने निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या निमित्ताने वृक्षारोपण, रूग्णांना फळवाटप आदी सामाजिक उपक्रमांनी समाजहित साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

कृष्णराव भेगडे 88 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांच्या 88 व्या अभिष्टचिंतनानिमित्त तळेगावमधील आजी, माजी विद्यार्थी व पालक यांच्या वतीने 88 वृक्षांचे वृक्षारोपण करून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Pune : लाचप्रकरणी आशिष बंगिनवार यांच्या कार्यालयाची मनसेच्या विद्यार्थी सेनेकडून तोडफोड

संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे म्हणाले, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, कृष्णराव भेगडे यांनी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेची माझ्याकडे जबाबदारी सुपूर्द केल्यापासून मावळमधील जनतेला विश्वासात घेऊन संस्थेचा कायापालट केला आहे. पालक व आजी, माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून संस्थेमध्ये आर्टस, काॅमर्स, सायन्स, बीबीए, बीसीए तसेच बी फार्मसी, डी फार्मसी, इंग्रजी माध्यमांच्या शाळांबरोबर तालुक्यातील गोरगरीब वंचित घटकांच्या शिक्षणासाठी (Talegaon Dabhade) इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या माध्यमातून नवनवीन तंत्रशिक्षणाचे अभ्यासक्रम संस्थेमध्ये सुरू होत आहे.

40 विद्यार्थी संख्येवर सुरू झालेल्या इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे नजिकच्या काळात इंद्रायणी विद्यापीठ साकार होणार आहे. ही साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुक्यासाठी अभिमानाची व आनंदाची बाब आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.