Ind Vs Wi : भारताचे मालिकेमध्ये पुनरागमन? टी-20 मालिकेमध्ये पहिला विजय

एमपीसी न्यूज – त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या (Ind Vs Wi) प्रॉव्हिडन्स मैदानावर मंगळवारी (दि 8) भारत विरुद्ध वेस्ट इंडीजच्या पाच सामन्यांच्या मालिकेचा तिसरा सामना झाला. भारताने पहिले दोन सामने गमावले असून कालच्या सामन्यातला त्यांचा 7 बळी राखून मिळवलेल्या विजयाने मालिकेमध्ये अजूनही त्यांना जिवंत ठेवले आहे.

वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकत पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि भारतासमोर 160 धावांचे लक्ष मांडले. वेस्टइंडीज कडून फलंदाजी करताना ब्रांडन किंग [42(42)] , रोवमन पॉवेल [40(19)*] आणि काईल मयर्सने [25(20)] चांगले योगदान दिले व अवघड खेळपट्टीवर वेस्ट इंडिजला सन्मानजनक धावसंख्या दिली.

भारताने गोलंदाजीने वेस्टइंडीज च्या बऱ्यापैकी सर्व फलंदाजांना नियंत्रणात ठेवले होते परंतु रोवमन पॉवेलच्या तुफानी फलंदाजीने त्यांना प्रश्नात टाकले. गोलंदाजी विभागामध्ये कुलदीप यादव यांनी तीन बळी घेऊन चांगली कामगिरी केली तर अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

भारताकडून लक्षाचा पाठलाग करताना सलामी फलंदाज स्वस्तात उडाले परंतु सूर्यकुमार यादव [83(44)] याच्या खेळीने भारतासाठी बऱ्यापैकी काम केले. तिलक वर्मा [49(37)*]आणि हार्दिक पंड्याने [20(15)*] शेवट पर्यंत स्वतःचा बळी राखून भारताला लक्ष मिळवून दिले. विंडीज कडून सुरुवातीला गोलंदाजी उत्तम झाली परंतु त्यानंतर ते अपयशीच ठरले.

Moshi : पूर्ववैमानस्यातून दोघावर तलवार व कोयत्याने वार

ओबेद मॅककॉय याने जयस्वालला पराभव करून अल्जारी जोसेफ याने शुभमन गिलचा पराभव केला. परंतु, नंतर सूर्यकुमार यादवने पूर्ण विंडीज गोलंदाजीला नष्ट केले. वेस्टइंडीजच्या गोलंदाजीला सूर्याचा बळी मिळाल्यावर थोडी सहानुभूती आली असली तरी तीलक वर्मा आणि पडण्याने चांगली कामगिरी करत (Ind Vs Wi) भारताला 7 बळी राखून जिंकवले.

18व्या षटकामध्ये भारताला विजयासाठी एक धाव हवी होती आणि तिलक वर्माला स्वतःचे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी ही एक धाव हवी होती. परंतु चेंडूचा सामना करत असलेल्या हार्दिक पांड्याने 18व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून सामना जिंकवला. परंतु या कृत्याने तिलक वर्माचे अर्धशतक पूर्ण झाले नसून बऱ्याच चाहत्यांना या गोष्टीची खंत वाटली. नेटकरी सध्या तात्पुरत्या कर्णधारावर भरपूर टीका करत आहेत व त्याला स्वार्थी ही म्हणत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.