Moshi : पूर्ववैमानस्यातून दोघावर तलवार व कोयत्याने वार

एमपीसी न्यूज : चार ते सहाजण जुन्या (Moshi) भांडणातून एकाला मारण्यासाठी आले, यावेळी मित्र भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडले असता त्यांच्यावरच तलवार व कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना मंगळवारी (दि.7) रात्री मोशी प्राधिकरण येथे घडली.

याप्रकरणी शकील जलील शेख (वय 27 रा भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी कृष्णा लहू वाघमारे, कुणाल विश्वास वायदंडे, गणेश गुलचंद काळोखे, साहिल दिनेश मोरे व त्यांचे दोन अनोळखी साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Pune : लाचप्रकरणी आशिष बंगिनवार यांच्या कार्यालयाची मनसेच्या विद्यार्थी सेनेकडून तोडफोड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र सचिन येरे व रिहान शेख असे गप्पा मारत बसले होते. यावेळी दुचाकीवरून आरोपी आले त्यांच्या हातात कोयते व तलवार होती.

येरे याच्या सोबत झालेल्या जुन्या भांडणाच्या रागातून ते येरेवर (Moshi) वार करणार होते. यावेळी फिर्यादी त्यांची भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडले असता आरोपींनी तलवारीने डोक्यात व कोयत्याने पायावर वार करत फिर्यादी यांना गंभीर जखमी केले. तसेच रिहान शेख याच्याही पाठीवर व हातावर कोयत्याने वार करत त्यालाही जखमी केले एमआयडीसी भोसरी पोलिसांनी सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.