IND Vs WI : पाच सामन्यांच्या मालिकेत विंडीजची भारतावर आघाडी; युवा खेळाडू ठरले अपयशी

एमपीसी न्यूज – त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या ब्रायन लारा मैदानावर गुरुवारी (दि 3) वेस्ट इंडीज ने भारतीय (IND Vs WI) क्रिकेट संघाला पाच धावांनी पराभूत केले. भारतीय क्रिकेट संघ हा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडू घेऊन उतरलेला. नाणेफेक जिंकत विंडीज ने फलंदाजी निवडून 150 धावांचे लक्ष भारतासमोर मांडले. 20 षटकांच्या खेळामध्ये सोपे वाटणारे हे लक्ष मिळवण्यासाठी भारतीय संघ कमीच पडला.

Chinchwad : सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्याकडे जनसंपर्काची जबाबदारी

पहिली फलंदाजी करताना विंडीजचा तुफानी खेळाडू काईल मायर्स [1 (3)] आणि जॉन्सन चार्ल्स [3(6)] हे स्वस्तात उडाले. परंतु त्यांच्यानंतर ब्रांडन किंग [28(19)] आणि आक्रमक फलंदाज निकोलस पूरण [41(34)] याने विंडीच्या खेळाला गरज असलेले संतुलन दिले. पुढाकार घेऊन नेतृत्व करत विंडीचा कर्णधार रोवमन पॉवेल याने अनुभवी खेळी करत 32 चेंडूंमध्ये 48 धावा काढल्या.

शिमरन हेटमायर [10(12)], रोमारिओ शेफर्ड [4(6)] आणि जेसन होल्डर [6(5)] यांनी खारीचा वाटा देत विंडीज ला 149 या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. भारताकडून गोलंदाजी करताना आकाश सिंग आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले तर हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

150 या लक्षाचा पाठलाग करताना भारताचा डाव सुरुवातीला गडबडला. ईशान किशन [6(9)] आणि शुभमन गिल [3(9)] यांनी भारताला हवी ती सुरुवात न देऊन अवघड परिस्थितीत टाकले. त्यानंतर सूर्यकुमार यादव [21(21)], युवा फलंदाज तिलक वर्मा [39(22)] आणि कर्णधार हार्दिक पांड्या [19(19)] यांनी भारतातला सामन्यांमध्ये पुन्हा आणण्याचा प्रयत्न केला परंतु ते अपयशी ठरले.

संजू सॅमसन [12(12)], आकाश सिंग [12(7)] आणि अक्षर पटेल [13(7)] यांचे प्रयत्न ही कमी पडले आणि भारत हा सामना पाच धावांनी हरला. विंडीज कडून गोलंदाजी करताना ओबेड मॅक्कॉय, जेसन होल्डर आणि रोमारिओ शेफर्ड यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले तर अकेल होसीन त्याने एक बळी घेतला.

भारताकडून भलेही गोलंदाजी चांगली झाली असली तरीही फलंदाजीमध्ये अनुभवाचा तुटवडा दिसून आला. भारतासाठी विश्वचषक बघता ही मालिका संघामधील नव्या संयोजनाचा प्रयोग करण्यासाठी चांगलं व्यासपीठ आहे. परंतु निवडकर्त्यांना प्रभावीत करण्याचे सोडून निराशच केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.