Pimple Gurav : वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून केरळ पूरग्रस्तांना आर्थिक मदत

माजी नगरसेवक राजेद्र जगताप यांचा उपक्रम

एमपीसी  न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक  राजेंद्र जगताप यांनी आपला वाढदिवसाचा अनाश्यक खर्च टाळून केरळ पूरग्रस्तांना 51 हजाराची आर्थिक मदत रिलिफ फंडाकडे सुपूर्द केली.

वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करून केरळ पुरग्रस्तांना 51 हजाराची आर्थिक मदत सकाळ रिलिफ फंडाकडे सुपूर्द केली. तसेच दुष्काळी भागातील व आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलांच्या शिक्षणाची तसेच त्यांचे संगोपन करणा-या स्नेहवन संस्थेत 11 हजार रूपयांची मदत केली.

यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे नाना काटे,  राजू बनसोडे, अतुल शितोळे, प्रशांत शितोळे, विजूअण्णा जगताप, उद्योजक विजूशेठ काटे, शाम जगताप, तानाजी जवळकर, अमरसिंग अदियाल, शिवाजी पाडुळे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार,  सुनील कदम, भाऊसाहेब जांभूळकर, अभिषेक जगताप आदी उपस्थित होते.

प्रभागतील महिला बचत गटाला तुळशीचे रोप गृहपयोगी वस्तु आरती संग्रहाचे वाटप करण्यात आले. परिसरातील राजकिय सामाजिक शैक्षणिक अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी राजेंद्र जगताप यांना शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.