Pimpri Fire News : दीड तासाच्या प्रयत्नानंतर डॉ. बेक कंपनीतील आगीवर नियंत्रण, कोणतीही जिवीतहानी नाही

एमपीसी न्यूज – गांधीनगर, पिंपरी येथील डॉ. बेक कंपनीतील एका युनिटला आज (शनिवारी) सायंकाळी सहाच्या सुमारास मोठी आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग व धुराचे लोट उठले होते. आगीची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे सात बंब घटनास्थळी दाखल झाले. तसेच, कंपनीची स्वतःची आग प्रतिबंधक यंत्रणा असल्याने  दीड  तासाच्या अथक प्रयत्नानंतर डॉ. बेक कंपनीतील आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाठिमागच्या बाजूला गांधीनगर येथे एलांटस बेक इंडिया नावाची कंपनी आहे. आज सायंकाळी सहाच्या सुमारास कंपनीच्या एका युनिटला अचानक आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग व धुराचे लोट उठले होते. कंपनीची स्वतःची आग प्रतिबंधक यंत्रणा असल्याने आग विझवण्याचे काम तात्काळ सुरू झाले. तसेच, काही वेळातच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे सात बंब घटनास्थळी दाखल झाले आणि एका तासात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

 

अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी किरण गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीची माहिती मिळताच बंब घटनास्थळी दाखल झाले. तसेच, कंपनीची स्वतःची यंत्रणा असल्याने आग लवकर नियंत्रणात आली. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी नमूद केले.

आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. पण, कंपनीचे कामकाज आज सुट्टीनिमित्त बंद होते. त्यामुळे कर्मचारी व इतर कोणी कंपनीत नसल्याने मोठी दुर्घटना टळली.


MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.