Chinchwad News : नंदकिशोर कल्चरल सोसायटीच्या वतीने पहिला पं. बिरजूमहाराज नृत्य महोत्सव

एमपीसी न्यूज – नंदकिशोर कल्चरल सोसायटी या नृत्य संस्थेमार्फत पहिला पं. बिरजूमहाराज नृत्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 14 आणि 15 मे रोजी हा महोत्सव होणार आहे. पं. बिरजूमहाराज नृत्य महोत्सव ‘कथक महायज्ञ ‘ या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवात दिल्ली येथील पं. बिरजूमहाराज यांच्या जेष्ठ शिष्या पद्मश्री शोवना नारायण तसेच पं. बिरजूमहाराज यांचे पुत्र पं. दीपक महाराज सहभागी होणार आहेत. या महोत्सवातील पहिल्या उपक्रमात 14 मे रोजी सकाळी 11 ते 2 वाजता प्रथमच पद्मश्री शोवना नारायण यांची कथक नृत्य कार्यशाळा होणार आहे. 15 मे रोजी सकाळी 11 ते 2 वाजता पं. दीपक महाराज यांची प्रथमच कथकनृत्य कार्यशाळा होणार आहे.

या नृत्य कार्य शाळेचा लाभ कथकगुरु, शिक्षक, ज्युनियर व सिनीयर विद्यार्थी यांना घेता येणार आहे. या नृत्य कार्यशाळेत लखनऊ घराण्यातील विविध रचना, बंदिशी, त्यातील सौंदर्य शिकायला मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे.

या नृत्य कार्यशाळेस प्रवेश मूल्य आहे. या नृत्य कार्यशाळेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी डाॅ. नंदकिशोर कपोते (9371099911) यांच्याशी संपर्क करावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.