Chinchwad : प्लास्टिक वापरणा-या व्यावसायिकांकडून पाच हजारांचा दंड    

एमपीसी न्यूज –  प्लास्टिक बंदी असताना देखील प्लास्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांवर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. डांगे चौक येथे २० दुकानांची तपासणी केली असता कचरा टाकल्याबद्दल एका नागरिकांकडून ५०० रुपये व एक बियर शॉपी कडून नॉनवोवन बॅग्ज एक किलो व ५० प्लास्टिक ग्लास आढळल्याने जप्त करुन त्यांना पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला.

ही कारवाई आज सोमवारी (दि. २०) करण्यात आली.  प्रभाग क्रमांक २४मध्ये सोमवारी (दि. २०) डांगे चौक येथे 20 दुकानांची तपासणी केली असता त्यापैकी कचरा टाकल्याबद्दल एका नागरिकाकडून 500 रु व 1 बियर शॉपी याकडून नॉनवोवन बॅग्ज 1 किलो व 50 प्लास्टिक ग्लास आढळल्याने जप्त केले व त्यांना 5000 रु चा दंड ठोठवण्यात आला.

ही सर्व कारवाई आरोग्य अधिकारी संजय कुलकर्णी व मुख्य आरोग्य निरीक्षक राजीव  बेद  व आरोग्य निरीक्षक एस.बी.चन्नाल व कर्मचारी यांनी सहभाग घेऊन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.