Chinchwad : जानकी देवी बजाज ग्राम विकास संस्थेच्या उन्हाळी शिबिरास मुलांचा प्रतिसाद

एमपीसी न्यूज – जानकी देवी बजाज ग्राम विकास संस्थेच्या आकुर्डी येथील समाज सेवा केंद्रात सुट्टीत विविध उपक्रम राबविले जातात. पंधरा दिवसाच्या उन्हाळी शिबिरात मुलांसाठी उन्हाळी शिबिर, किशोरी मुली आणि महिलांसाठी शिबिर अत्यंत अल्प शुल्कात घेतले जाते. उन्हाळी शिबिरात मुलांसाठी विविध क्राफ्ट, रोप मल्लखांब,जीम्नास्तिक, डान्स, पपेट शोच्या माध्यमातून बोध देणा-या गोष्टी मुलांना सांगितल्या जातात. या उन्हाळी शिबिरात लहान मुलांचा प्रतिसाद उत्स्फूर्त मिळाला.

तसेच खाऊ बनवायला शिकविले जाते. कसे वागावे, राहावे असे संस्कारही दिले जातात. प्रार्थना, योगासने ध्यान ह्या सर्वांचा समावेश १५ दिवसाच्या शिबिरात असतो. मुलींसाठी विविध उपयुक्त वस्तू , आरोग्याविषयी, करिअर, मानसिकता या विविध विषयावर मार्गदशन केले जाते. महिलांसाठी त्यांच्या आवडी आणि छंद जपल्या जाव्यात, अशा उपयुक्त वस्तूंच्या कार्यशाळेचे आयोजन केले जाते. महिला आणि मुलींना खास डान्सचे हि प्रशिक्षण दिले जाते. सर्वांचा आत्मविश्वास वाढून नवीन गोष्ठी शिकण्याच्या आनंदा बरोबर एक व्यासपिठ मिळणे हा मुख्य उद्देश आहे .

  • सर्व शिबिराच्या समारोपाच्या दिवशी शिबिरातील सर्व प्रशिक्षणाचे सादरीकरण होते. एकूण 250 मुले, 45 मुली, आणि 35 महिलांनी याचा लाभ घेतला. या व्यतिरिक्त शिकून आर्थिक हाथभार मिळेल असे रांगोळी, मेहंदी, नेमप्लेट, कुशन, बॅग असे छंद वर्ग राबविले जात आहेत. आत्तापर्यंत 200 पेक्षा जास्त मुलीं-महिलांनी याचा लाभ घेतला आहे.

याबाबत नेहा पाटील म्हणाल्या की, या उपक्रमांमुळे खूप कमी दिवसात खूप चांगले प्रशिक्षण मिळाले. नवीन बरेच काही मुले शिकली, उत्साह वाढून, अत्यंत कमी शुल्कात हे फक्त समाजसेवा केंद्रातच होऊ शकते.

  • संस्थेचे चीफ ओप्रेटिंग ऑफिसर डॉ.अरुण जोशी सामाजिक बांधिलकी जपता यावी म्हणून समाज सेवा केंद्रात विविध शिबिराबरोबरच वर्षभर प्रशिक्षण आणि उपयुक्त उपक्रम राबविले जातात. याचा फायदा हजारो कुटुंबियांना होत आहे, असे मत व्यक्त केले.

    समाजसेवा केंद्रातील सर्व शिक्षक, मदनीस आणि सहकारी यांच्या सहकार्यांने सर्व शिबिर अत्यंत योग्य पद्धतीने पार पडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.