Pimpri Crime News : झेरॉक्स काढून इंजिनिअरिंग पुस्तकाची विक्री, कॉपीराईट ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – इंजिनिअरिंग पुस्तकाची झेरॉक्स काढून विक्रीसाठी ठेवले व पुस्तकाची साॅफ्ट कॉपी संगणकात जतन केली. कॉपीराईट ॲक्टचे उल्लंघन केल्याप्रकरणी झेरॉक्स सेंटरमधील चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पॅराडाईज कॉपी अँड स्टेशनरी व ओम साई कॉपिअर्स, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे शनिवारी (दि.26) दुपारी दीड वाजता ही घटना घडली.

प्रकाशक रवींद्र विठ्ठल वाणी (वय 51, रा. प्रभात रोड, पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून गणेश बाबुभाई परमार (वय 26, रा. अजमेरा कॉलनी, पिंपरी), घनश्याम बाबुभाई परमार (वय 25, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी), रियाज खान मोहम्मद इलियास खान (वय 31, रा. पिंपरी) आणि भास्कर शिवाजी दुधभाते (वय 32, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांच्या विरोधात कॉपिराईट ॲक्ट 1957 कलम 63, 65 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रविंद्र वाणी यांचा टेक्निकल पब्लिकेशन नावाने पुस्तके प्रकाशित करण्याचा व्यवसाय आहे. अनुराधा पुनतांबेकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील CBCE TE कॉम्पुटर इंजिनिअरिंगच्या सहाव्या सत्रासाठी वेब टेक्नॉलॉजी नावाचे पुस्तक लिहले आहे. वाणी या पुस्तकाचे फेब्रुवारी 2022 मध्ये प्रकाशन केले, ज्याची 595 एवढी किंमत आहे. आरोपी यांनी या पुस्तकाचे झेरॉक्स काढून विक्रीसाठी ठेवले. तसेच, पुस्तकाची सॉफ्ट कॉपी देखील संगणकामध्ये जतन करून ठेवली. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.