Bhosari : व्यावसायिकाची 40 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – भाड्याने जागा देऊन त्यावर पत्र्याचे शेड बांधण्यासाठी एका व्यावसायिकाची 40 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना एमआयडीसी भोसरी येथे जानेवारी ते नोव्हेंबर 2017 या कालावधीमध्ये घडली.

सुभाष शालीग्राम गुप्ता (वय 63, रा. औंध) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मिरको डायनामिक प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक इर्शाद अली विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ता यांना एका मोकळ्या भाडयाच्या जागेत एक पत्र्याचे शेड बांधून हवे होते. त्यासाठी ते जागा शोधत होते. आरोपी अली याने गुप्ता यांच्याशी संपर्क केला आणि मोकळ्या जागेसह पत्र्याचे शेड असल्याचे सांगितले. 40 हजार चौरस फूट जागेवर पत्र्याचे शेड बांधून देण्याचे आरोपीने मान्य केले. त्याबदल्यात गुप्ता यांनी अली याला जानेवारी ते नोव्हेंबर 2017 या कालावधीमध्ये 24 लाख रुपये दिले. पैसे घेऊन देखील अली याने गुप्ता यांना मोकळ्या जागेत शेड बांधून दिले नाही. यावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.