Hinjawadi : बँकेच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून साडेबारा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – चौकशीसाठी बँकेच्या कस्टमर केअरला फोन केला असता प्रतिनिधीने साडेबारा लाखांची फसवणूक केली. ही घटना 31 ऑगस्ट 2021 ते 2 सप्टेंबर 2021 या कालावधीत माण येथे घडली.

PCMC : ….अखेर पिंपरी-चिंचवडकरांची प्रतिक्षा संपली

निमिष सुशीलकुमार सिंघल (वय 51, रा. वाकड. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी हिंजवडी (Hinjawadi) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 18002081252, 8513957350, 9339093383 या क्रमांकावरून बोलणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आयसीआयसीआय बँकेच्या कस्टमर केअरला चौकशीसाठी फोन केला. फोनवरील व्यक्तीने फिर्यादी यांना एका वेबसाईटवर माहिती भरण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी माहिती भरली. त्यानंतर फिर्यादी यांच्या बँक खात्यावर 12 लाख 50 हजार 281 रुपये जमा झाल्याचा एक मेसेज आला. त्याबाबत फिर्यादी यांनी कस्टमर केअरला माहिती दिली.

त्यानंतर फिर्यादी यांच्या खात्यातून 12 लाख 50 हजार 281 रुपये ट्रान्सफर करून घेत त्यांची फसवणूक केली. हिंजवडी (Hinjawadi) पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.