PCMC : ….अखेर पिंपरी-चिंचवडकरांची प्रतिक्षा संपली

पिंपरी आणि चिंचवड स्थानकाकरिता सिंहगड एक्सप्रेसमध्ये दोन स्वतंत्र रेल्वे बोगी आजपासून

एमपीसी न्यूज :  सिंहगड एक्सप्रेस (11010) मध्ये पिंपरी आणि चिंचवड स्थानकाकरिता रविवारी दि. 11.06.2023 पासुन दोन स्वतंत्र बोगी देण्यात आल्या असून, पिंपरी करिता D7 तर चिंचवड करिता D8 अश्या दोन स्वतंत्र बोगी देण्यात आल्या आहेत. अखेर पिंपरी चिंचवड (PCMC) करांची प्रतिक्षा संपली असून सुखकर प्रवासाचा आनंद प्रवाशाना घेता येणार आहे.

 

Nigdi : संस्कार वर्ग, आनंद वर्गातील मुलांच्या माध्यमातून आपण एक कुटूंब संस्कारित करत असतो : उज्वला शेट्ये

रेल्वे प्रवासी संघ पिंपरी-चिंचवड (पुणे) यांच्याकडून मागील जवळपास दहा वर्षापासून पिंपरी-चिंचवड (PCMC) करिता स्वतंत्र बोगीची मागणी केली जात होती. त्याकरिता अध्यक्ष रेल्वे प्रवासी संघ पिंपरी-चिंचवड, पुणे ईक्बाल भाईजान मुलाणी, केंद्रीय रेल्वे विभाग सल्लागार समिती सदस्य बशीर सुतार, यांच्या नेतृत्वाखाली संघटनेकडून मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रशासनास पत्रव्यवहार करून, भेटीगाठी घेण्यात आल्या. त्याचप्रमाणे सदर बाब मावळ लोकसभेचे संसदरत्न खासदार  श्रीरंग आप्पा बारणे यांच्याकडेही लेखी निवेदन देऊन, वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून पिंपरी-चिंचवड करांची ही समस्या मांडण्यात आली होती.
सदर बाबत खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी लोकसभेमध्ये शुन्य प्रहरात हा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्याशी चर्चा करून प्रवाशांच्या गैरसोयी सोडविण्यासाठी प्रयत्न केले होते, याचेच फलित म्हणून उदया पासुन सिंहगड एक्सप्रेस मध्ये पिंपरी आणि चिंचवड करिता स्वतंत्र बोगीची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
रेल्वे प्रवासी संघ पिंपरी-चिंचवड (PCMC) पुणे यांच्यावतीने पिंपरी-चिंचवड येथील सर्व प्रवाशांना याबाबत हार्दिक शुभेच्छा देण्यात येत असून सर्व प्रवाशांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
 सिंहगड एक्सप्रेस (11010) ची बोगी पोझिशन खालील प्रमाणे असेल –
1) जनरेटर
2) D1- रिझर्वेशन
3)D2- रिझर्वेशन

4)D3- रिझर्वेशन
5)D4- रिझर्वेशन
6)D5-जनरल
7)D6-जनरल
8)D7-जनरल (पिंपरी करिता)
9)D8-जनरल (चिंचवड करिता)
10)C1-एसी रिझर्वेशन
11)D9- जनरल (लोणावळा करिता)
12)D10-जनरल (लोणावळा करिता)
13)D11- जनरल(शिवाजीनगर करिता)
14)D12-जनरल (शिवाजी नगर करिता)
15)D13- जनरल (महिलाकरिता)
16)D14- एसएलआर (खडकी करिता)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.