Pavana Dam update : पिंपरी-चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटण्याच्या मार्गावर ….पवना धरणाचा पाणीसाठा 73 टक्यांवर

गेल्या चोवीस तासात 82 मिली मीटर पाऊस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकर आणि मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाची (Pavana Dam update) संततधार सुरूच आहे.  गेल्या 24 तासात 82 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा 73 टक्यांवर गेला आहे.

Pune : वाघोली गावाच्या विकासकामांबाबत लवकरच आढावा बैठक घेणार – उदय सामंत

पवना धरणातून पिंपरी-चिंचवड, मावळातील गावांना, शेतीला पाणीपुरवठा केला जातो. या भागासाठी पाणी पुरवठ्याचा पवना धरण मुख्य स्त्रोत आहे. पवना धरणाचे काम सन 1972 साली पूर्ण झाले आहे.

महापालिका पवना नदीतून रावेत येथील  बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो.  सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला (Pavana Dam update) जातो.

धरणातील पाण्याची परिस्थिती!

# गेल्या 24 तासात झालेला पाऊस – 82 मिली मीटर

# 1 जूनपासून झालेला एकूण पाऊस –  1559 मिली मीटर

# गेल्यावर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस –  1580 मिली मीटर

#  धरणातील सध्याचा पाणी साठा – 73.59 टक्के

# गेल्यावर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा – 80.46 टक्के

# गेल्या 24 तासात पाणी साठ्यात झालेली वाढ – 3.70 टक्के

# 1 जूनपासून पाणी साठ्यात झालेली वाढ – 55.59 टक्के

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.