Nigdi: वंडरलँड स्कूलमधील मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचा 61 महिलांना लाभ

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ओम प्रतिष्ठान संचलित वंडरल‌ँड स्कूल मध्ये काल (शुक्रवारी) आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचा लाभ 61 महिलांनी घेतला. 

शिबिरामध्ये सर्व तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक सहभागी झाले होते. त्यात डॉ. साहेबराव टोके, डॉ. स्नेहल टोके,  डॉ . पराग पाटील यांचा समावेश होता. तपासणी केलेल्या महिलांपैकी पाच महिलांना पुढील विशेष उपचारांची आवश्यकता असल्याचे आढळून आले. डॉ. टोके यांच्या मार्गदर्शनाखाली हे पुढील उपचार करण्यात येणार आहेत.

वंडरलँड स्कूलमध्ये झालेल्या या शिबिराचा सर्व पालक महिला तसेच शाळेच्या परिसरातील महिलावर्गाने लाभ घेतला. सर्व डॉक्टरांनी तपासणीचा माध्यमातून महिलांना त्यांच्या आरोग्याबद्दल मार्गदशन दिले.  त्यांच्या आरोग्याविषयक अडचणींचे निराकरण केले. आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा जागरूकतेने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. दिवसभर इतरांसाठी मेहनत घेत असताना स्वतःच्या आरोग्यकडे दुर्लक्ष होते. आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमाचे संयोजन कविता हरसुले यांनी केले. वनिता सावंत यांनी आभार मानले. शिबिरात संयोजन वंडरलँड स्कूलची पूर्ण टीम सहभागी झाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.