Vadgaon Maval : बी. एड. च्या विद्यार्थ्यांनी आई व सासूबाई यांचे पाद्यपूजन करून साजरा केला महिला दिन

एमपीसी न्यूज – अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ येथे 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त बी. एड. च्या विद्यार्थ्यांनी (Vadgaon Maval ) आपल्या आई व सासूबाईंचे पाद्यपूजन करून अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला.

ज्या आई व सासूबाईंनी लग्नानंतर पुढील शिक्षणासाठी प्रेरणा दिली तसेच शिक्षण चालू असल्याने घरकाम व मुलांना सांभाळत आपल्या मुलीच्या किंवा सुनेच्या शिक्षणात अडथळा येऊ दिला नाही म्हणून त्यांच्याबद्दल कृतज्ञ भावनेतून महिला दिनानिमित्त महाविद्यालयात पाद्यपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

Pune : तुमचा फोटो काढायचा आहे असे सांगून चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेला लुटले

मार्गदर्शक व प्रभारी प्राचार्य डॉ. अनिता धायगुडे यांचा जवार गट व मार्गदर्शक डॉ. संदीप गाडेकर यांचा वरई गट यांनी आयोजित केलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते ॲड. किशोर ढोरे हे होते त्यांनी स्त्रियांवरील अत्याचार व कायदे या विषयक सविस्तर असे मार्गदर्शन केले.अध्यक्षस्थानी डॉ. शितल दुर्गाडे या होत्या. त्यांनी विद्यार्थिनी व्यक्तिमत्व विकास यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या आई व सासूबाई तसेच अध्यापक महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्य डॉ.अनिता धायगुडे, डॉ. कविता तोटे, डॉ.संदीप गाडेकर, डॉ. शितल देवळालकर, सहा.प्रा. ज्योती रणदिवे, सहा.प्रा.सोनाली पाटील, डॉ. अनुप्रीया कुमारी, ग्रंथपाल सुजाता जाधव, मोहन कडू व बी. एड. व एम. एड. चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सदर महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले व सचिव अशोक बाफना व सर्व पदाधिकारी यांनी स्टाफ विद्यार्थ्यांचे कौतुक (Vadgaon Maval ) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.