Pune : तुमचा फोटो काढायचा आहे असे सांगून चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेला लुटले

एमपीसी न्यूज – तुमचा फोटो काढायचा आहे, असे सांगून ( Pune)  दोन चोरट्यांनी बँकेत आलेल्या एका ज्येष्ठ महिलेचे 85 हजार 100 रुपयांचे सोन्याचे दागिने हातचलाखीने लुटले. संतोषनगर कात्रज येथील 75 वर्षीय ज्येष्ठ महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि.6)  दुपारी साडेबाराच्या सुमारास कात्रज चौकातील स्टेट बँकेच्या पायरीवर घडली आहे.

Sharad Pawar : शरद पवारांनी भोरमध्ये केली सुप्रिया सुळेंच्या उमेदवारीची घोषणा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्येष्ठ महिला कामानिमित्त बँकेत गेल्या होत्या. त्या बाहेर आल्या असता, आरोपींनी, तुम्हाला परत बँकेत बोलावले आहे, असे सांगून बँकेबाहेरील पायरीवर बसवून ठेवले. तुम्ही येथेच बसा, बँकेत गर्दी आहे, तुमचा फोटो काढायचा आहे.

त्यामुळे तुमच्या अंगावरील दागिने काढून तुमच्या पर्समध्ये ठेवा, असे सांगून त्यांचा विश्‍वास संपादन केला. दरम्यान, फिर्यादींना समोरील व्यक्ती बँक कर्मचारी असल्याचे वाटले. त्यामुळे तो सांगेल त्याप्रमाणे त्या करत गेल्या. त्याच संधीचा फायदा घेत दोघांनी हातचलाखी करत त्यांच्याकडील दागिने चोरल्याचे फिर्यादीत नमूद ( Pune)  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.