Pimpri : टोलच्या बनावट पावत्या देऊन फसविणारे टोल नाक्यावरील दोन कर्मचारी गजाआड

एमपीसी न्यूज – टोलच्या बनावट पावत्या देऊन त्याचा पैसा लुबाडणा-या टोलनाक्यावरील दोन कर्मचा-यांना पोलिसांनी गजाआड केले आहे. गुरूवारी (दि. 21) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उर्से टोलनाका येथे ही घटना घडली.

गणेश शिवाजी चव्हाण (वय 32, रा. उर्से टोलनाका, ता. मावळ, मूळ रा. कोपर्डे, जि.सातारा) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनील शहाजी जाधव (वय 24, रा. दुघोंडी, ता. मावळ) आणि राहुल धनाजी घोदे (वय 26, रा. सलगरे, ता. मिरज, जि. सांगली) यांना अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी गणेश चव्हाण हे उर्से टोलनाक्यावर शिप इन्चार्ज म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आरोपी सुनील आणि राहुल यांची नेमूणक टोलनाक्यावरील सात क्रमांकाच्या बुथवर टोल वसुलीसाठी करण्यात आली होती. मात्र, या दोन्ही आरोपींनी मोटारधारकांना टोलच्या खोट्या पावत्या देऊन त्याचे पैसे स्वत:कडे ठेवत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरुन फिर्यादी चव्हाण यांनी त्यांच्याविरूद्ध फिर्याद दाखल केली. त्यानुसार तळेगाव दाभाडे पोलिसांनी त्यांना जेरबंद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.