Chinchwad : जुगार अड्ड्यावर छापा; पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज – चिंचवड पोलिसांनी बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारला. यामध्ये पाच जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (दि. 18) रात्री आठच्या सुमारास चिंचवड गावातील वेताळनगर झोपडपट्टी येथे करण्यात आली.

महादेव कल्लाप्पा कांबळे (वय 50, रा. मोरया हाऊसिंग सोसायटी, वेताळनगर, चिंचवड), डॉमनिक जॉन जोसेफ (वय 36, रा. आम्रपाली सोसायटी, ओटास्किम, निगडी), विजयकुमार दयाराम दास (वय 43, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड), वैभव शिवाजी पवार (वय 33, रा. पवार नगर, काळेवाडी), नितीन ज्ञानोबा काळे (वय 28, रा. चाफेकर चौक, चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेताळ नगर झोपडपट्टी जवळ मोरया हाऊसिंग सोसायटी बिल्डिंग नंबर सातच्या समोर काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून वरील पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, महादेव आणि डॉमनिक हे दोघेजण मुंबई मटका नावाच्या जुगाराच्या चिठ्ठ्या देत होते. तर विजयकुमार, वैभव आणि नितीन हे मटका घेत होते. सर्वांकडून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण 2 हजार 550 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपींवर मुंबई जुगार अॅक्ट कलम 12 (अ) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.