Pune : गणेशोत्सवाची 26 तास 36 मिनिटांच्या मिरवणुकीने सांगता

गत वर्षीपेक्षा यावर्षी मिरवणूक 2 तास 31 मिनिटे लवकर संपली

एमपीसी न्यूज – ढोल-ताशांचा दणदणाट, सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांची चौफेर उधळण,   ‘मोरयाऽऽ मोरयाऽऽ’चा जयघोष करत वादकांना भाविकांकडून मिळणारी उत्स्फूर्त दाद, नानाविध रूपांतील गणरायाचा थाट, उकाडा वाढत असतानाही या जल्लोषी वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी लोटलेला भक्तांचा जनसागर, अशा भक्तिमय वातावरणात जागोरसिद्ध असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाची 26 तास 36 मिनिटांच्या मिरवणुकीने सांगता झाली. गत वर्षीपेक्षा 2 तास 31 मिनिटे यावर्षी मिरवणूक लवकर संपली.  

मानाचा गणपतींची विसर्जन मिरवणूक सकाळी साडेदहाच्या  सुमारास सुरू झाली. त्याआधीपासूनच शहराच्या मध्यभागातील रस्ते ‘गणरंगा’त न्हाऊन निघाले होते. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘श्रीं’ची आरती झाल्यानंतर मुख्य विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे , पोलीस आयुक्त के. व्यकटेशम , जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे उपस्थित होते.

मानाचा पहिला कसबा गणपती सनईवादनाने सुरुवात फुलांनी सजवलेल्या चांदीच्या पालखीतून ‘श्रीं’ची मिरवणूक काढण्यात आली. देवळणकर बंधूंच्या नगारावादनाने मिरवणूक महात्मा फुले मंडईतील टिळक पुतळ्यापासून लक्ष्मी मार्गाच्या दिशेने मार्गस्थ झाली. या मिरवणुकीची सुरवात सकाळी साडे दहा वाजता झाली तर विसर्जन 4 वाजून 08 मिनिटांनी झाली.

मनाचे पाच गणपती मिरवणूक सुरुवात आणि विसर्जन वेळ

कसबा गणपती :
मिरवणूक सुरवात – सकाळी 10 वाजून 30 मिनिटे
विसर्जन – 4 वाजून 08 मिनिटे

तांबडे जोगेश्वरी :
मिरवणूक सुरवात – 10 वाजून 35 मिनिटे
विसर्जन – 5 वाजून 13 मिनिटे

गुरुजी तालीम :
मिरवणूक सुरवात – 10 वाजून 43 मिनिटे
विसर्जन – 5 वाजून 33 मिनिटे

तुळशीबाग :
मिरवणूक सुरवात  – 12 वाजून 25 मिनिटे
विसर्जन : 6 वाजून 25

केसरीवाडा :
मिरवणूक सुरवात – 1 वाजून 40 मिनिटे
विसर्जन – 7 वाजून 05 मिनिटे

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट :
मिरवणूक सुरवात – रात्री 7 वाजून 50 मिनिटे
विसर्जन : 2 वाजून 30 मिनिटे

अखिल मंडई मंडळ :
मिरवणूक सुरवात – रात्री 8 वाजून 11 मिनिटे
विसर्जन – 4 वाजून 30 मिनिटे

श्रीमंत दगडूशेठ गणपती :
मिरवणूक सुरवात : 11 वाजून 05 मिनिटे
विसर्जन : 4 वाजून 58 मिनिटे

गेल्या काही वर्षांतील मिरवणुकीसाठी लागलेला वेळ

२०१८ : २६ तास ३६ मिनिटे
२०१७  :  २८ तास ०५ मिनिटे
२०१६  :  २८ तास ३० मिनिटे
२०१५  : २८ तास २५ मिनिटे
२०१४  : २९ तास १२ मिनिटे
२०१३  : २९ तास २५ मिनिटे
२०१२  : २९ तास
२०११  : २७ तास २० मिनिटे
२०१०  : २७ तास २५ मिनिटे
२००९  : २५ तास ४५ मिनिटे
२००८  : २८ तास १५ मिनिटे
२००७  : ३० तास २० मिनिटे
२००६  : २९ तास ३० मिनिटे

दरम्यान, यावर्षी डीजेला न्यायालयाने बंदी घातल्यामुळे पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळे यांच्या अनेक ठिकाणी संघर्ष पाहायला मिळाला . तर बहुतांश गणपती मंडळाने न्यायालयाच्या निर्णयाला कात्रजचा घाट दाखवत स्वातंत्र्यानंतर प्रथमच सवनिय कायदेभंग केल्याचे चित्र पुणे शहरात सर्वत्र पाहायला मिळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.