Chakan : गणेश भक्तांकडून गणेश मूर्ती दान 

भामा नदीत प्रदूषण होऊ नये यासाठी उपाययोजना

एमपीसी न्यूज – भामा नदीच्या तीरावरील विसर्जन घाटावर रविवारी (दि.२३) चाकण नगरपरिषद आणि विविध संस्था संघटनांच्या प्रतिनिधींनी गणेश भक्तांकडून दान मूर्ती स्वीकारल्या.

चाकण नगर परिषद, लायन्स क्लब यांनी मूर्ती दान करण्यासाठी नागरिकांना आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केलेल्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. चाकण नगरपरिषदेच्या वतीने वाहनांची आणि विसर्जन हैदाची व्यवस्था करण्यात आली होती.  नगरपरिषदेच्या वाहनांत नागरिकांनी निर्माल्य दान केले.

विसर्जनस्थळी आलेल्या भाविकांनी आरती केल्यानंतर बाप्पांची मूर्ती उपस्थित संस्थांना सुपूर्त केली. रविवारी रात्री उशिरा पर्यंत शेकडो गणेशमूर्ती भाविकांनी दान दिल्या. लायन्स क्लब ऑफ चाकण व अष्टविनायक गोविंदा पथकाच्या स्वयंसेवकांनी या दान मूर्ती स्वीकारल्या. विसर्जन मिरवणुका शांततेत पर पडाव्यात यासाठी पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. भामा नदीत प्रदूषण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या होत्या अशी माहिती चाकण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष शेखर घोगरे, उपनगराध्यक्ष प्रकाश गोरे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.