Chakan : बाजारात नवीन बटाट्याची मोठी आवक

एमपीसी न्यूज – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डात या हंगामातील बटाटा सुपर ज्योती वाणाची आवक सुरू झालेली आहे.

मागील महिनाभरात चाकण मार्केटमध्ये या बटाट्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली असून पावसाळी नव्या हंगामातील हा बटाटा खेड तालुक्यातील पश्चिम डोंगराळ भागातील औदर, औंढे, सुपे अनावळे, पाईट, कोये, साबुर्डी, सायगाव, वेताळे आदी भागातून मोठ्या प्रमाणावर विक्री करता बाजारात येत असल्याची माहिती खेड बाजार समितीचे सचिव सतीश चांभारे यांनी दिली. 

चाकण बाजारात शनिवारी (दि.२२) नवीन बटाट्याची एकूण २ हजार ३०० क्विंटलची आवक झाली.  या नव्या बटाट्याला सरासरी १ हजार २०० ते १ हजार ६०० रुपये क्विंटल असा बाजारभाव मिळाला. नव्या बटाट्याला मिळत असलेल्या चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.