Crime News : पोलिसात तक्रार केली तर सोडणार नाही म्हणणाऱ्या गुंडांना अटक

एमपीसी न्यूज –  दापोडी येथे गाड्यांची तोड़फोड करत आम्ही इथले भाई आहोत, पोलिसात तक्रार केली तर सोडणार नाही म्हणणाऱ्या तथाकथीत भाईंना मात्र भोसरी पोलिसांनी (Crime News) बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार शनिवारी (दि.23) रात्री अकराच्या सुमारास दापोडीतील सुंदरबाग कॉलनीत झाला होता.

 

शेखर सुदाम भालेराव (वय 20 रा. दापोडी), अंकीत सुदाम भालेराव (वय 21 रा. दापोडी), सुमित भिम सुर्यवंशी (वय 19 रा.दापोडी) व रोनीत मोरे (वय 19 रा. दापोडी) या चौघांना पोलिसांनी अटक केली असून (Crime News) आदित्य कांबळे (वय 21), रोहित सरोदे (वय 20), अजय जाधव (वय 20) सर्व राहणार दापोडी हे अद्याप फरार आहेत. याप्रकरणी संदिप विनायक बागुल (वय.48 रा. दापोडी) यांनी भोसरी पोलीसठाण्यात तक्रार दिली होती.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दापोडीतील सुंदरबाग कॉलनीत आरडा-ओरडा करत परिसरात दहशत माजविण्याच्या हेतूने पार्क केलेल्या कार व टेम्पोच्या काचा दगडाने फोडल्या. तसेच फिर्यादीचा भाऊ  पराग हा त्यांना अडविण्यास गेला असता शेखर, अंकीत व सुमीत याने परागला मारहाण करत त्याच्या खिश्यातील बाराशे रुपये (Crime News) जबरदस्तीने काढून घेतले. तसेच पोलीस तक्रार केली तर बघून घेऊ, आम्ही ईथले भाई आहोत,तुम्ही आमचे काय वाकडे करणार म्हणत धमकी दिली.  यावरून भोसरी पोलिसांनी कारवाई करत चार जणांना अटक केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.