Pimpri News : जिजाऊ क्लिनिक, जाहिरात होर्डिंगसाठी सल्लागार

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्यावतीने शहरात विविध ठिकाणी जिजाऊ क्लिनिक उभारण्यात येणार आहेत. तसेच दापोडी ते निगडी, सांगवी फाटा ते किवळे बीआरटी मार्गावर जाहिरातीसाठी (Pimpri News) अत्याधुनिक स्ट्रक्चरल स्टीलचे होर्डिंग बसविण्यात येणार आहेत. या दोन्ही कामांसाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे.

महापालिकेचे क्षेत्रफळ सुमारे 181 चौरस किलोमीटर आहे. औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी – चिंचवड शहरात रोजगारानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शहरात निवास करणाऱ्या (Pimpri News) नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा मुबलक प्रमाणात चांगल्या प्रकारे उपलब्ध व्हाव्यात म्हणून शहरातील दाट लोकवस्तीतील भागांमध्ये ठिकठिकाणी जिजाऊ क्लिनिक सुरू करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.

 

शहरातील 8 ते 10 हजार लोकसंख्येच्या दाट लोकवस्ती आणि झोपडपट्टी भागात जिजाऊ क्लिनिक उभारणार आहेत. तसेच एक किलोमीटर अंतरात महापालिकेचे रुग्णालय किंवा दवाखाना नाही, अशा ठिकाणी हे क्लिनिक सुरू करणार आहे.क्लिनिक उभारणे तसेच नवीन जाहिरात होर्डिंग धोरणानुसार दापोडी ते निगडी, सांगवी फाटा ते किवळे या दोन बीआरटी मार्गांवर जाहिरातींसाठी स्ट्रक्चरल स्टीलचे होर्डिंग्ज बसविण्यासाठी प्रशासक राजेश पाटील (Pimpri News) यांनी सूचना दिल्या.

या दोन्ही कामांवर सल्लागाराच्या नेमणुकीसाठी दरपत्रक मागविले. तीन सल्लागारांचे दरपत्रक प्राप्त झाले. त्यात मॅप्स ग्लोबल सिव्हिलटेक प्रा.लि. यांनी 1.95 टक्के दर सादर केला. हा दर लघुत्तम असल्याने स्वीकृत केला. या सल्लागार एजन्सीला 1.95 टक्के शुल्क देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.