Crime News : पिंपरीत पादाचाऱ्यास मारहाण करीत लुटले

एमपीसी न्यूज – घरी जाणाऱ्या पादाचाऱ्याच चौघांनी मारहाण करत लुटले आहे. हा प्रकार पिंपरी येथे 18 जुलै रोजी मध्यरात्री घडला आहे.

 

 

याप्रकरणी अजय बाबुराव सातपुते (वय 24. रा.कुदळवाडी) यांनी रविवारी (दि.24) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Crime News : पोलिसात तक्रार केली तर सोडणार नाही म्हणणाऱ्या गुंडांना अटक

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे 18 जुलै रोजी मुंबईवरून पुण्याला रेल्वेने येत होते. पिंपरी रेल्वे स्थानकावर रेल्वेगाडी स्लो झाली असता ते तेथे उतरले. तेथून ते पायी मोरवाडी चौकाकडे जात होते. यावेळी अज्ञात चार इसम तेथे आले व त्यांनी फिर्यादीला अडवून कोयत्याने डाव्या पायावर मारून त्यांच्याजवळील मोबाईल व 17 हजार 300 रुपये रोख असा एकूण 19 हजार 800 रुपयांचा एवज चोरून नेला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.