Crime News : हडपसरमध्ये लिफ्टमधून खाली जाताना कुत्रा चावला, मालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पुण्याच्या हडपसर परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत एका कुत्र्यामुळे पुन्हा वाद निर्माण झालाय. लिफ्टमधून खाली उतरत असताना कुत्रा चावल्याने एका महिलेने पोलिसात (Crime News) तक्रार दिली. त्यानुसार या कुत्र्याची मालक असणाऱ्या महिले विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

राशी अभिषेक सक्सेना (वय 44) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार मनीषा सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार 20 जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमारास मगरपट्टा रोड (Crime News) परिसरातील कुमारसीयना या सोसायटीमध्ये घडला.

 

 

Crime News : पोलिसात तक्रार केली तर सोडणार नाही म्हणणाऱ्या गुंडांना अटक

 

याप्रकरणी अधिक माहिती, फिर्यादी या 20 जुलैच्या संध्याकाळी राहत्या सोसायटीच्या लिफ्टमधून खाली येत होत्या. यावेळी मनीषा सिंग यांची मुलगी त्यांचा कुत्रा लिफ्टमधून घेऊन जात होत्या. यावेळी कुत्रा कोणाला चावू नये याबाबत कोणतीही दक्षता न घेतल्याने कुत्रा फिर्यादी यांच्या अंगावर धावून आला आणि त्यांच्या उजव्या हाताला (Crime News) चावला. याशिवाय आरोपी यांचा कुत्रा वेळोवेळी सोसायटीतील इतर लोकांच्या अंगावर धावून गेला आणि त्यांना चावला आहे. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.