Crime News : लग्न झालेले नसतानाही तरुणीची समाजात बदनामी, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – लग्न झालेले नसतानाही खोटा निकाहनामा तयार करून तो खरा असल्याचे भासवून समाजातील विविध मॅरेज ग्रुपवर हा निकाहनामा टाकून एका तरुणीची बदनामी करण्यात आली. 23 वर्ष तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल (Crime News) करण्यात आला आहे. इमरान समीर शेख (रा. विकास नगर, घोरपडी) आणि शेख खलील शेख जलील (रा. इस्लामपूरा, अमदापुर बुलढाणा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इमरान शेख यांनी आरोपी शेख जलील याच्या मदतीने फिर्यादी यांची समाजात बदनामी केली. आरोपीला फिर्यादीचे लग्न झालेले नाही हे माहीत असतानाही त्यांनी संगनमत करून फिर्यादी यांचा फोटो नाव टाकून खोटी सही अंगठा असलेले बनावट मॅरेज सर्टिफिकेट आणि निकाहनामा (Crime News) तयार केला. त्यानंतर हा निकाहनामा त्यांच्या समाजातील लोकांना कळावे यासाठी वेगवेगळ्या मॅरेज ग्रुपवर आणि वेगवेगळ्या लोकांच्या व्हाट्सअप ग्रुपवर पाठवला.
हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादीने चंदनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.