Gas cylinder : महिला दिनानिमित्त गॅस सिलिंडेरवर 100 रुपयांची सवलत, पंतप्रधान मोदींची घोषणा

एमपीसी न्यूज –  आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Gas cylinder)   देशातील महिलांना मोठी भेट दिली आहे. महिलांना घरगुती गॅस सिलिंडरवर 100 रुपयांची सवलत दिली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे.
  पीएम मोदींनी ट्विट केले की, ‘आज महिला दिनानिमित्त आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांची सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
यामुळे महिला शक्तीचे जीवन तर सुसह्य होईलच शिवाय करोडो कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल.हे पाऊल पर्यावरण रक्षणासाठीही उपयुक्त ठरेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य सुधारेल”.

महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना मोठी भेट दिली आहे. आजपासून घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 100 रुपयांनी कमी झाली आहे. पंतप्रधान मोदींनी आज सोशल मिडीयावर पोस्टद्वारे याची घोषणा केली आहे.
राजधानीत गॅस सिलिंडर फक्त 603 रुपयांना मिळणार
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 2024-25 या वर्षातही प्रति सिलिंडर 300 रुपये अनुदान सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. सुमारे 10 लाख लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. त्यांना वर्षभरात 12 सिलिंडरवर सबसिडी मिळणार आहे. दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 903 रुपये आहे परंतु योजनेअंतर्गत 603 रुपयांना सिलिंडर उपलब्ध होणार (Gas cylinder) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.