एमपीसी न्यूज –  तीन हजारांची लाच घेतल्या प्रकरणी शिरुर ( Shirur ) येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक व त्याच्या सहकाऱ्याला लाच घेताना अटक केली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि. 6) धामारी, शिरूर येथील बस स्टॅन्ड सोमरील रोडवर केली.

भूकरमापक शिवराज यशवंत बंडगर (वय 24) व खासगी इसम अमोल विष्णू कदम (वय 27) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

Gas cylinder : महिला दिनानिमित्त गॅस सिलिंडेरवर 100 रुपयांची सवलत, पंतप्रधान मोदींची घोषणा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने त्याची शेत जमीनची हद्द कायम करण्यासाठी भूमीलेख कार्यालय येथे अर्ज केला होता. त्यासाठी लागणारी फीस देखील अर्जदाराने भरली होती. मात्र आरोपीने 5 हजार रुपयांची लाच मागितली.

तडजोडी अंती 3 हजार रुपये ठरले. जे देण्यासाठी धामारी येथील बस स्टॅन्ड सोमर बालावले असता सापळा रचून रंगे हात अटक कऱण्यात आली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करत ( Shirur ) आहेत.