Gas cylinder : व्यावसायिक गॅसचा दर वाढला

एमपीसी न्यूज – देशाचा अर्थसंकल्प  सादर होण्यापूर्वीच ( Gas cylinder) अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. व्यावसायिक गॅस दर पुन्हा वाढले आहेत.   व्यावसायिक गॅस सिलेंडर 14 रुपयांनी महागला असून, फेब्रुवारीच्या पहिल्या दिवसापासून अर्थात आजपासून हे नवे दर लागू झाले आहेत.

Budget : आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार देशाचा अर्थसंकल्प

डिसेंबर महिन्यात केंद्राने व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 30.50 रुपयांची कपात केली होती. त्यानंतर जानेवारीत देखील व्यावसायिक गॅसचे दर2 रुपयांनी कमी करण्यात आले होते.

मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक गॅस महागला आहे. त्यामुळे आज दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर 1769.50 रुपये, कोलकातामध्ये 1887
पये, चेन्नईत 1723.50 रुपये तर मुंबईत व्यावसायिक सिलेंडरचा दर आता 1723.50 रुपये इतका झाला आहे. दरम्यान, घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मात्र कोणतीही दरवाढ करण्यात आलेली ( Gas cylinder) नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.