Gyanvapi : अखेर ज्ञानवापीच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार मिळाला

एमपीसी न्यूज – वाराणसीतील ज्ञानवापी प्रकरणात मोठा निर्णय आला ( Gyanvapi) आहे. वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण चेश्वेश यांच्या न्यायालयात मंगळवारी हिंदू आणि मुस्लिम पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला. कोर्टाने हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार हिंदूंना आता वाराणसीतील ज्ञानवापी तळघरात पूजा करण्याचा अधिकार मिळाला आहे.

 

Gas cylinder : व्यावसायिक गॅसचा दर वाढला

 

ज्ञानवापी मशिदीमध्ये एक तळघर आहे, ज्यामध्ये सोमनाथ व्यास  हे देवतेच्या मूर्तीची पूजा करत असत. डिसेंबर 1993 मध्ये राज्याच्या तत्कालिन मुलायम सिंह यादव सरकारच्या तोंडी आदेशानुसार, तळघर सील करण्यात आले आणि तळघरात पुजा करण्यास मनाई करण्यात आली. नंतर तिथे बॅरिकेड लावण्यात आले,.तळघर 1993 पासून बंद होते आणि तळघराची चावी वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे संरक्षक म्हणून ठेवण्यात आली होती.

2016 मध्ये सोमनाथ व्यास यांचे नातू शैलेंद्र पाठक यांनी वाराणसी न्यायालयात याचिका दाखल करून त्यांची मालमत्ता परत करण्याची मागणी केली होती. अखेर काल (बुधवार  दि .31 जानेवारी )  याप्रकरणी न्यायालयाने  हा आदेश दिला. तळघरात पूजा करण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे.

वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आदेशात म्हटले की, तळघराचा ताबा वाराणसीचा जिल्हा दंडाधिकाऱ्याकडे आला आहे, त्यामुळेच विश्वनाथ मंदिराचे पुजारी ते तळघर स्वच्छ करुन तिथे नियमित पूजा करतील. तिथे लावलेले बॅरिकेडिंगहीं हटवण्याचे निर्देश दिले आहेत. वाराणसी न्यायालयाने सोमनाथ व्यास यांच्या कुटुंबीयांना या पूजेचा अधिकार ( Gyanvapi )   दिला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.