Pune : जीवनविद्या मिशनतर्फे 11 फेब्रुवारी रोजी विश्वप्रार्थना जप

'तुमचा उत्कर्ष, तुमच्या हातात' यावर व्याख्यान

एमपीसी न्यूज – ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ असा ( Pune) संदेश देणारे थोर समाज सुधारक सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जीवनविद्या मिशनने घरोघरी विश्वप्रार्थना या दिव्य उपक्रमाचा संकल्प केला आहे. 11 फेब्रुवारी रोजी पुण्यातील एस.पी. कॉलेजच्या मैदानावर सायंकाळी साडेचार ते रात्री  आठ या वेळेत भव्यदिव्य विश्वप्रार्थना महाजपयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती जीवनविद्या मिशनचे पिंपरी-चिंचवडचे शाखेचे अध्यक्ष अमर गावडे यांनी दिली.

विश्वप्रार्थना महाजपयज्ञाचे चार पुष्प नागपूर, मुंबई, कराड, यवतमाळ येथे झाले आहेत. पाचवे पुष्प पुण्यात होत आहे. प्रल्हाद वामनराव पै यांचे ‘तुमचा उत्कर्ष, तुमच्या हातात’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. सद्गुरू श्री वामनराव पै यांचे जन्मशताब्दी वर्षे आहे. दिव्य, सकारात्मक आणि शुभ विचारांच्या विश्व प्रार्थनेची जागोजागी, घरोघरी पेरणी व्हावी आणि दिव्य, सुंदर विचारांच्या लहरी सर्वत्र पसराव्यात हा घरोघरी विश्वप्रार्थना या उपक्रमाचा हेतू आहे. विश्वप्रार्थना महाजपयज्ञामध्ये सहभागी होऊन अगणित पुण्य प्राप्तीची तसेच सहज समाज उपयोगी दिव्य कर्म करण्याची संधी उपलब्ध आहे.

Gyanvapi : अखेर ज्ञानवापीच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार मिळाला

विश्वप्रार्थना सुंदर विचारांनी भरलेली व भारलेली आहे. विश्वप्रार्थना म्हणजे प्रत्यक्षात सुंदर विचारांची सोन्याची खाण आहे. स्वतःसाठी मागताना, इच्छा करताना, मनात शंका-कुशंका येतात. परंतु, सर्वांसाठी मागतो, विचार करतो, त्यावेळेस शंका-कुशंका येत नाहीत. प्रार्थना अंतर्मनात सहज जाते, क्रिया तशी प्रतिक्रिया या निसर्ग नियमाप्रमाणे लाभ होतो. या दिव्य उपक्रमात शहरातील नागरिकांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गावडे यांनी केले ( Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.