TRAI DND App : सरकारी डीएनडी ॲप; अनोळखी कॉल्स आणि मेसेज पासून होणार सुटका

एमपीसी न्यूज – भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने डू नॉट डिस्टर्ब (DND) हे ॲप लॉन्च केले ( TRAI DND App) आहे. पहिल्या ॲप मधील त्रुटी दूर करत हे ॲप नव्याने लॉन्च करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना अनोळखी कॉल्स आणि मेसेज पासून सुटका मिळणार आहे.

नागरिकांना येणाऱ्या अनोळखी कॉल्स आणि मेसेजचे प्रमाण मोठे आहे. एका अहवालानुसार भारतातील प्रत्येक मोबाईल युजरला दररोज किमान सहा अज्ञात क्रमांकावरून कॉल येतात. यावर मात करण्यासाठी ट्रायने डीएनडी ॲप सादर केले.

Pune : जीवनविद्या मिशनतर्फे 11 फेब्रुवारी रोजी विश्वप्रार्थना जप

या ॲप बद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. या ॲपच्या मदतीने अनोळखी नंबर वरून येणारे कॉल आणि मेसेज ब्लॉक करता येऊ शकतात. यामुळे नागरिकांना डिस्टर्ब करणाऱ्या कॉल्स पासून संरक्षण मिळते. शिवाय हे ॲप अधिकृत असल्याने यापासून कोणताही डेटा चोरीला जाण्याचा धोका नाही.

ट्रायने सुरुवातीला लॉन्च केलेल्या ॲप मध्ये काही त्रुटी होत्या. त्या दूर करून नव्याने ॲप लॉन्च करण्यात आले आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी अँड्रॉइड फोन असल्यास गुगल प्ले स्टोअर वरून ट्राय डीएनडी 3.0 हे ॲप डाऊनलोड करा. ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ओटीपी द्वारे लॉगिन करा. एकदा लॉगिन केल्यानंतर डीएनडी ॲप मोबाईल वापरकर्त्याच्या नंबरवर काम करण्यास सुरुवात करेल. यानंतर नको असलेले कॉल आणि मेसेज ब्लॉक होतील. या ॲपच्या मदतीने कोणत्याही कॉल किंवा कोणत्याही नंबरची तक्रार देखील करता ( TRAI DND App) येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.