Pune – गॅस सिलेंडरची चोरी करणारा पोलिसांच्या ताब्यात; चोरीचे 27 गॅस सिलेंडर हस्तगत

एमपीसी न्यूज – गॅस वितरण टेम्पो चालकाची नजर चुकवून पार्क केलेल्या टेम्पोमधून गॅस सिलेंडर चोरी करणा-या संजय चंद्रकांत गिजरे (वय 45, रा.धनकवडी) व एक अल्पवयीन मुलगी यांना गुरूवारी (दि.13) रात्री 7 च्या दरम्यान उत्तमनगर येथून ताब्यात घेऊन तब्बल 27 गॅस सिलेंडर, एक दुचाकी असा एकूण 77 हजार 330 रूपयांचा माल हस्तगत केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमनगर येथे गस्त घालत असताना पोलिसांना नंबर प्लेट नसलेली एक मोपेड दिसली व दूचाकीवर तीन गॅस सिलेंडरदोघेजण घेऊन जाताना दिसले. उत्तमनगर येथे झालेल्या गॅस चोरीच्या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना मिळालेले सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना मोपेडवरील दोघांवर संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांची चौकशी केली असता सुरवातीला दिलेल्या उडवाउडवीच्या उत्तरांमुळे त्या दोघांना पोलिस स्टेशनला आणून गॅस चोरीचे सीसीटीव्ही फुटेज दाखवल्यानंतर त्यांनी तो गुन्हा केल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता तो बिल्डींगमध्ये सिंलेडरची डिलिवरी देण्यासाठी आलेल्या गॅस वितरण टेम्पो चालकाची नजर चुकवून पार्क केलेल्या टेम्पोमधून गॅस
सिलेंडर चोरी करून नेत असल्याचे उघडकीस आले. त्याने पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून तब्बल 27 गॅस सिलेंडरची चोरी केल्याचे कबुल केले. आरोपीकडून चोरीचे 27 गॅस सिलेंडर, एक दुचाकी असा एकूण 77 हजार 330 रूपयांचा माल
हस्तगत केला आहे. याप्रकरणी पुढील तपास उत्तमनगर पोलिस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87aa49009c12230b',t:'MTcxNDE3MzQzNi45MDEwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();