Alandi : आळंदी येथे गीता जयंती उत्साहात साजरी

आळंदी: कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। हे भगवान (Alandi) श्रीकृष्णाचे वचन ज्या गीतेत सांगितले‌ आहे. त्या गीतेची जयंती आज दि.22 रोजी ज्ञानेश्वर विद्यालयात संपन्न झाली. गीता, तुलसी पूजन तसेच गीतेची आरती व प्रदक्षिणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. इ.11 वी च्या विद्यार्थ्यांनी‌ भगवद्गीते विषयी आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प. संतोष महाराज खातेळे, प्रशालेचे उपमुख्याध्यापक‌ सुर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, श्रीधर घुंडरे, साहेबराव वाघुले, वैशाली शिर्के, लता बिरदवडे, शबाना इनामदार आदी उपस्थित होते.

Pune : वाचन न करणारे आउट ऑफ डेट होतात – ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर

भगवद्गीता माणसाला कसे जगायचे तर भागवत कसे मरायचे हे शिकविते असे ह.भ.प. खातळे महाराज यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात विचार व्यक्त केले. इ.11 वी च्या विद्यार्थ्याने श्रीमदभगवद् गीतेचे चित्र काढून कलादालनास भेट दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीधर घुंडरे यांनी केले तर सूत्रसंचालन लता बिरदवडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.