Pune : माझ्या आयुष्यात एवढ्या मोठ्या प्रमाणातील पुस्तक प्रदर्शन पाहिले नाही : चंद्रशेखर बावनकुळे

एमपीसी न्यूज – पुणे पुस्तक महोत्सव पुण्यात नव्हे, तर राज्यातही (Pune)प्रसिद्ध झाला आहे. मी माझ्या आयुष्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावरील पुस्तक प्रदर्शन पाहिले नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत सामान्य नागरिकांची पुस्तक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता, हे पुस्तक महोत्सवाचे यश आहे. या पुस्तक महोत्सवातून मी सुद्धा तीन पुस्तके खरेदी केली आहेत.

Kharadi : महापारेषणचे खराडी उपकेंद्र दुरुस्तीसाठी बंद; मात्र नगर रोड वीजपुरवठ्यावर परिणाम नाही

आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून(Pune) तर, अमितभाई शहा यांनी पक्ष कार्यालयात ग्रंथालय असण्याबाबत भूमिका मांडली होती. त्या अनुषंगाने हा पुस्तक महोत्सव महत्त्वाचा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे अमृत काळातील भारत सुवर्ण काळाकडे जात आहे. अमृत काळाचा संकल्प आणि सुवर्ण काळाचे स्वप्न पूर्ण होण्याला पुणे महोत्सवाच्या हातभार लागणार आहे.

पुण्यात भव्य स्वरूपाचे पुस्तकांचा महोत्सव भरल्यामुळे नॅशनल बुक ट्रस्ट आणि महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांचे अभिनंदन करायला हवे, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.