Pune Metro : पुणे मेट्रोकडून ‘एक पुणे विद्यार्थी पास’ कार्डची विद्यार्थ्यांना भेट

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रोने 12 ऑगस्ट रोजी ‘एक पुणे कार्ड’ या पुणे मेट्रोच्या बहुउद्देशीय कार्डचे लोकार्पण (Pune Metro) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते केले. या कार्डचे शुक्रवारी (दि. 6) लोकार्पण करण्यात येणार आहे.

पुणे मेट्रोतून दैनंदिन प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रीपेड ‘एक पुणे विद्यर्थी पास’ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी मेट्रोने एचडीएफसी बँकेसोबत भागीदारी केली आहे. कार्ड भारतीय पेमेंट (RuPay) योजनेवर आधारित आहे. ‘एक पुणे विद्यर्थी पास’ हे बहुउद्देशीय कार्ड आहे.

ते मेट्रोच्या प्रवासाबरोबरच भारतात कुठेही रिटेल पेमेंटसाठी वापरले जाऊ शकते. एक पुणे विद्यर्थी पास देशातील नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) च्या नियमांचे पालन करते. त्यामुळे भारतातील इतर कोणत्याही मेट्रो आणि बस सेवांमध्ये वापरले जाऊ शकते. हे एक स्पर्श विरहित (कॉन्टॅक्टलेस) कार्ड आहे आणि त्यामुळे पेमेंट जलद होते. एक पुणे विद्यर्थी पास सर्व मेट्रो स्थानकांवर उपलब्ध असेल.

एक पुणे विद्यर्थी पास कार्ड घेण्यासाठी 13 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्याखालील वय असणारे विद्यर्थी हे कार्ड घेऊ शकत नाहीत. 13 ते 18 वर्षे वय असणारे विद्यार्थी पॅन कार्ड नसल्यास एक ई-फॉर्म भरून आपले एक पुणे विद्यर्थी पास कार्ड प्राप्त करू शकतात.

यासाठी (Pune Metro) आधार कार्डच्या शेवटच्या चार क्रमांकाची आवश्यकता असेल. हे कार्ड घेण्यासाठी महाविद्यालयाचे अधिकृत ओळखपत्र किंवा चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक असेल. हे कार्ड घेणाऱ्या प्रत्येक विद्यर्थ्याला तिकीट दरामध्ये 30 टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. या कार्डची वैधता 3 वर्षे असून हे कार्ड अहस्तांतरणीय आहे.

या कार्डची बाकी रचना आणि हे कार्ड प्राप्त करण्याची प्रकिया ‘एक पुणे कार्ड’ प्रमाणे आहे. हे कार्ड सर्व मेट्रो स्थानकांवर उपलब्ध आहे. प्रवासी पुणे मेट्रोच्या संकेत स्थळावर उपलब्ध ई-फॉर्म भरून ‘एक पुणे विद्यर्थी पास’ प्राप्त करू शकतात.

Pune : आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकीच्या दृष्टीने धावपट्टी वाढविण्यासाठी सर्वेक्षण करा – चंद्रकांत पाटील

या कार्डमध्ये पैसे भरण्यासाठी आपण कोणत्याही ई-वॉलेट, पुणे मेट्रो स्थानकात येऊन किंवा एक पुणे कार्ड संकेतस्थळावरून ऑनलाईन पेमेंट करता येईल. या कार्डद्वारे कोणतेही 2000 रुपयांपर्यंतचे व्यवहार सहज करता येऊ शकतात. या कार्डला दिवसाच्या 20 व्यवहारांची मर्यादा देण्यात आली आहे.

पहिल्या दहा हजार विद्यार्थ्यांना ‘एक पुणे विद्यर्थी पास’ हे मोफत दिले जाणार आहे. त्यानंतर कार्डची किंमत 150 रुपये आणि वार्षिक शुल्क 75 रुपये असे असेल.

पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर म्हणाले, “पुणे शहराला पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून संबोधले जाते. शहराला समृद्ध शैक्षणिक वारसा लाभला आहे. शहरात देशाच्या कानाकोपऱ्यातून शिक्षणासाठी विद्यार्थी येत असतात. एक पुणे विद्यार्थी पासचा शुभारंभ हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. याचा उद्देश विद्यार्थ्यांचा प्रवास केवळ किफायतशीरच नाही तर सुरक्षित, आरामदायी आणि जलद बनवण्याद्वारे त्यांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास किंवा वाचवलेल्या प्रवासाच्या वेळेसह छंद जोपासण्यास सक्षम बनवण्याचा आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.