Crime news : कंपनीत कॉन्ट्रॅक्ट द्या म्हणत धमकी देणार्‍यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : कंपनीमध्ये वेगवेगळे कॉन्टॅक्ट द्या नाहीतर माथाडीची काम (Crime news) म्हणून पैसे द्या म्हणत कंपनीमध्ये धमकी देऊन शिवीगाळ केल्याची घटना बुधवार 2 नोव्हेंबर रोजी घडली आहे.

याबाबत स्वप्निल पवार, वय 35 वर्षे, रा. यमुना नगर, निगडी यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Mahesh Landge : शहरातील प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार महेश लांडगे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे!

राजेंद्र कडलग ओमकार कोयते दोघे रा. ता. मावळ जिल्हा पुणे या आरोपींच्या विरोधात भा.द.वि कलम 385, 447, 504, 506, 34 अन्वये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Crime news) आरोपींनी आपापसात संगनमत करून बेकायदेशीरपणे फिर्यादीच्या बेकर ह्यूज या कंपनीत 2 नोव्हेंबरला दुपारी 12:40 ते 2 वा. चे सुमारास येऊन फिर्यादीला कंपनीमध्ये वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्ट द्या नाहीतर माथाडीचे काम म्हणून आम्हाला पैसे द्यावे लागतील नाहीतर कोणतीही गाडी आज बाहेर पडू देणार नाही. अशी धमकी देऊन पार्किंग मधील गाड्यांच्या ड्रायव्हर व लोकांना शिवीगाळ करून धमकी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.