Gold Price Today in Pune : सोन्यानं ओलांडला 62 हजारांचा टप्पा

एमपीसी न्यूज़  : सध्या सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या (Gold Price Today in Pune) असून सोन्याने आता 62 हजारांचा टप्पा गाठला आहे. पुण्यात आज (12 एप्रिल) 24 कॅरेट सोन्याचा प्रतीतोळा दर 62430 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 57880 रुपये प्रती तोळा इतका आहे.  हा भाव काल पासून ₹670 नी वाढल्याचे दिसून येत आहे. काल हाच भाव ₹61,790 एवढा होता

जगाच्या तुलनेत भारतीयांना सोन्याचं आकर्षण सर्वाधिक आहे. सोनं अंगावर मिरवायला आणि बाळगायला भारतीयांना खूपच आवडतं. लग्न, सणासुदीला सोन्याचे दागिने घातले जातात. पिढ्यांपिढ्या सोन्याची भारतीय नागरिकांवर छाप पडली आहे. त्यामुळे सोन्याचं शून्य उत्पादन असलेल्या भारताचा आंतरराष्ट्रीय बाजारात दबदबा पाहायला मिळतो. मात्र गेल्या काही दिवसात सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत

Pune : महाराष्ट्रातला केशर, हापूस आंबा जपान, अमेरिकेत पोहोचला

आज, 23 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमला ₹62,430  एवढा असून काल पासून ₹670 नी वाढल्याचे दिसून येत आहे. काल हाच भाव ₹61, 790 एवढा होता.

तसेच 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹ 57,880 एवढा असून काल पेक्षा ₹670 नी वाढल्याच दिसून येत आहे. काल 22 कॅरेट सोन्याचा भाव₹57,210 एवढा होता. (Gold Price Today in Pune)  तर चांदी चा भाव मात्र ₹1000 नी घसरल्याचे दिसून येते, आज 1 किलो चांदी चा भाव ₹77,000 एवढा आहे.  मागील काही दिवस चांदीचा भाव 1 किलोला ₹78,000 एवढा होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.