Pimpri Traffic : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुक्रवारी (दि. 14) सर्वत्र साजरी होत आहे. जयंती निमित्त पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जयंती आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी (Pimpri Traffic) शुक्रवारी मोठ्या प्रमाणात अनुयायी पिंपरी चौकात येत असतात. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. हे बदल शुक्रवारी दुपारी तीन पासून मिरवणूक संपेपर्यंत असतील. याबाबत पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी सूचना दिल्या आहेत.

 

  • महावीर चौक चिंचवड कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरीकडे सर्व्हिस रोडने येणारी वाहतूक बंद असेल. ही वाहतूक डी मार्ट ग्रेड सेपरेटरमध्ये वळविण्यात येईल.

 

  • नाशिक फाट्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरीकडे सर्व्हिस रोडने येणारी वाहतूक बंद असेल. ही वाहतूक डेअरी फार्म ग्रेस सेपरेटर इन व एच पी पंप खराळवाडी ग्रेड सेपरेटर इन मधून वळविण्यात येईल.

 

  • स्व. इंदिरा गांधी उड्डाणपूल येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे येणारी वाहतूक बंद असेल. ही वाहतूक उड्डाणपुलावरून मोरवाडी चौकाकडे जाईल.

 

  • नेहरूनगर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरीकडे येणारी वाहतूक बंद असेल. ही वाहतूक एच ए कॉर्नर बस स्टॉप येथून मासुळकर कॉलनीकडे वळविण्यात येईल.

 

  • जय मल्हार खानावळ सम्राट चौक येथून मोरवाडी चौकाकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद असेल.

 

  • सायन्स पार्क कडून मोरवाडी चौकाकडे येणारा मार्ग बंद असेल. ऑटो क्लस्टर कडून येणारी वाहतूक मदर टेरेसा ब्रिजकडे बालविण्यात येईल.

Gold Price Today in Pune : सोन्यानं ओलांडला 62 हजारांचा टप्पा

  • क्रोमा शोरूम कडून गोकुळ हॉटेलकडे जाणारी वाहतूक बंद असेल.

 

  • पिंपरी चौकाकडून स्व. इंदिरा गांधी उड्डाणपुलाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद केली जाईल.

 

  • हॅरिस ब्रिज दापोडी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, दापोडी गाव या दरम्यान सहा मिरवणुका निघणार आहेत.  त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी भोसरी वाहतूक विभागांतर्गत दापोडी येथून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

 

  • हॅरिस ब्रिज ते फुगेवाडी चौक सर्व्हिस रोडने जाणारा मार्ग बंद असेल. या मार्गावरील वाहतूक हॅरिस ब्रिजने ग्रेड सेपरेटर मधून जाईल.

 

  • बोपोडी संविधान चौकाकडून दापोडी शिवाजी पुतळा येथे जाणारा मार्ग बंद असेल. या मार्गावरील वाहने हॅरिस ब्रिज दापोडी मार्गे इच्छित स्थळी जातील.

 

  • शितळा देवी चौकाकडून दापोडी गावाकडे जाणारा मार्ग बंद असेल. या मार्गावरील वाहतूक शितळा देवी चौकाकडून सांगवी मार्गे इच्छित स्थळी जाईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.