Hinjawadi : लग्नात मानपान न केल्याने विवाहितेचा छळ

 एमपीसी न्यूज – लग्नात मानपान न केल्याच्या कारणावरून (Hinjawadi) विवाहितेचा छळ केला. तसेच विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेतला. हा प्रकार अनंतानगर, हिंजवडी येथे घडला.

 

विशाल विलास सांगळे (वय 26), विलास सांगळे (वय 55), वैभव विलास सांगळे (वय 24), एक महिला (वय 50, सर्व रा. ठाणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित विवाहितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri Traffic : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेच्या सासरच्या लोकांनी विवाहितेसोबत वारंवार वाद घातला. लग्नात मानपान केला नाही, हुंडा दिला नाही, या कारणावरून फिर्यादीच्या आई वडिलांकडे पैशांची मागणी केली. फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मुलगा पाहिजे असल्याचा आग्रह केला. (Hinjawadi) फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ करून लग्नात दिलेले स्त्रीधन फिर्यादीकडून घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.