Pimpri : कारच्या धडकेत सात वर्षीय मुलाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – आलिशान कारच्या धडकेत (Pimpri) सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 11) दुपारी पावणे पाच वाजताच्या सुमारास नेहरूनगर पिंपरी येथील रसरंग चौकात घडली.

रावसाहेब आण्णा काकडे (वय 41, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. याबाबत ऑडी कार (एमएच 14/सीएम 9595) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hinjawadi : लग्नात मानपान न केल्याने विवाहितेचा छळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या सात वर्षीय मुलाला आरोपीने भरधाव वेगात कार चालवून धडक दिली. त्यात फिर्यादी यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. (Pimpri) त्यातच त्याचा मृत्यू झाला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.