Vadgaon Maval : महाराजस्व अभियानांतर्गत ‘शासन आपल्या दारी उपक्रम’, ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद 

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील वारंगवाडी, आंबी गावात शुक्रवारी (दि. 1) महाराजस्व अभियानांतर्गत ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये उत्पन्नाचा दाखला, संजय गांधी योजना, मतदार नोंदणी, कृषीसवर्धन विभाग, पशुसंवर्धन, जातीचे दाखले, विद्युत विभाग, आधार कार्ड, रेशन कार्ड, लसीकरण यांसारख्या शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देण्यात आला. वारंगवाडी येथे 453 आणि आंबी येथे 575 अशा एकूण 01 हजार 28 लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेतला.

महाराजस्व अभियानांतर्गत शासन आपल्या दारी या उपक्रमाद्वारे वारंगवाडी – आंबी गावी शुक्रवारी (दि.1 ) उपक्रम पार पडला. या उपक्रमात 1028 लाभार्थीना विविध योजनांअंतर्गत लाभ मिळवून देण्यात आला. आमदार सुनील शेळके यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन केले होते.

पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठल शिंदे, उद्योजक सुधाकर शेळके, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नारायण ठाकर, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, पोलीस पाटील भानुदास दरेकर आणि माजी सरपंच ज्ञानेश्वर मांडेकर आदी मान्यवरांनी उपस्थिती दाखवून उपक्रमाची पाहणी केली. सर्व मान्यवरांचा आंबी वारंगवाडी ग्रामस्थ, ग्रुप ग्रामपंचायत आंबीचे सरपंच संगीता भरत घोजगेसह सर्वसदस्य यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

दरम्यान, परिसरातील नागरिकांची विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी गर्दी झाली होती.बहुतांश नागरिकांनी मास्क परिधान केले होते. कोविड नियमांचे पालन करण्यासाठी प्रशासनाकडून वारंवार नागरीकांना आवाहन करण्यात येत होते. यावेळी परिसरातील नागरीक योग्य ते कागदपत्रांसह रांगेत उभे असल्याचे पाहायला मिळाले.

शासन आपल्या दारी या उपक्रमाव्दारे आज दिवसभरात झालेल्या उपक्रमात जवळपास वारंगवाडी येथे 453 व आंबी येथे 575 असे एकूण 1028 लाभार्थ्यांना विविध योजनांमध्ये लाभ मिळवून देण्यात आला.

  • उत्पन्नाचा दाखला – 50 + 63
  • संजय गांधी योजना -22 +11
  • मतदार नोंदणी – 21 + 52
  • कृषीसवर्धन विभाग – 20 +16
  • पशुसंवर्धन- 22 आंबी
  • जातीचे दाखले- 5 आंबी
  • विद्युत विभाग- 39 आंबी
  • आधार कार्ड- 45 + 39
  • रेशन कार्ड- 42 + 145
  • लसीकरण- 252 + 210 आदी नागरिकांनी लाभ घेतला.

या उपक्रमात ग्रामपंचायत उपसरपंच सागर शिंदे, सदस्य,प्रदीप बनसोडे, विक्रम कलवडे, सारीका धुमाळ,मंगल घोजगे, प्रियंका शिंदे, सुरेखा घोजगे, निलेश घोजगेसह युवा नेते समीर जाधव, माजी सरपंच वामन वारींगे, उद्योजक प्रफुल्ल शिंदे, माजी उपसरपंच बाबासाहेब घोजगे, आंबळे विविध कार्यकारी सेवा संस्थेचे सचिव दत्तात्रय वारींगे, रामनाथ (पप्पू) धुमाळ आदींनी कार्यक्रम यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेऊन, उत्तम प्रकारचे नियोजन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.