Chakan Crime News : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 50 हजार खंडणीची मागणी

एमपीसी न्यूज – व्हॉटस्अपवर मेसेज करत फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत 50 हजार रूपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 29 ते 30 सप्टेंबर 2021 दरम्यान निघोजे, ता. खेड, पुणे याठिकाणी हा प्रकार घडला.

याप्रकरणी एका महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रविंद्र कोली (पूर्ण नाव माहित नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेच्या मुलीला व्हॉटस्अपवर मेसेज केला, वेगवेगळे फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली. त्याबदल्यात 50 हजार रूपयांची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.