Chakan : चाकण येथील रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्तम प्रतिसाद

एमपीसी न्यूज – भारत विकास परिषद, पिंपरी चिंचवड शाखा (Chakan) व एस के एस फास्टनर लिमिटेड, चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने चाकण एमआयडीसी येथील एस के एस फास्टनर लिमिटेड येथे बुधवारी (दि.5) रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

एस के एस फास्टनर लिमिटेडचे राजीव अगरवाल, डायरेक्टर, पवन गायकवाड, प्रमुख, क्यू एम एस, मुनिश राठी, प्रमुख अकाऊंट फायनान्स, विनोद वर्मा प्रमुख मानव संसाधन, रामू नायडू डेप्युटी मॅनेजर क्यू एम एस यांनी खूप परिश्रम घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन केले.

एस के एस फास्टनर लिमिटेडच्या वरीष्ठ अधिकारी व कामगारांनी मिळून 158 बाटल्या रक्तदान करून मानवतेचे दर्शन घडविले.

Jejuri : जेजुरीतील राष्ट्रवादी नेते पानसरे यांची कुऱ्हाडीने व कोयत्याने वार करत हत्या

भारत विकास परिषद, पिंपरी चिंचवड शाखा एस के एस फास्टनर लिमिटेड (Chakan) कंपनीची अत्यंत ऋणी आहे. भा.वि.प. सदस्य डॉ दामोदर कुलकर्णी यांनी या शिबिरासाठी विशेष प्रयत्न केले.

जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. काळे वैद्यकीय अधिकारी, संतोष अनगोळकर रक्तपेढी अधिकारी व त्यांचे सहकारी यांनी उत्तम नियोजन करून रक्त घेण्याचे कार्य केले. सर्व रक्तदात्यांचा सर्टिफिकेट देऊन गौरव करण्यात आला.

तसेच, एस के एस फास्टनर लिमिटेड कंपनीला गौरवपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ रामचंद्र आपटे, अध्यक्ष भा वि प पिंपरी चिंचवड व पवन गायकवाड, प्रमुख – क्यू एम एस, यांनी आभार प्रदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.