Jejuri : जेजुरीतील राष्ट्रवादी नेते पानसरे यांची कुऱ्हाडीने व कोयत्याने वार करत हत्या

एमपीसी न्यूज – पुणे पुन्हा एकदा एका हत्येने हादरले. जेजुरी नगरपरिषदेचे राष्ट्रवादीचे (Jejuri) माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांच्यावर चार ते पाच जणांनी कोयता कुऱ्हाडीने करून हत्या केली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.7) संध्याकाळी साडेपाच वाजता घडली. ही हत्या जमिनीच्या वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

या घटनेत पानसरे हे गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी पुणे येथील रुग्णलयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी वनेश प्रल्हाद परदेशी, किरण वनेश परदेशी, स्वामी वनेश परदेशी व इतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतजमिनीच्या वादातून पानसरे यांची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मेहबूब पानसरे यांची नाझरे धरण परिसरात शेती आहे. मेहबूब पानसरे यांचे वनेश परदेशी यांच्यात शेतजमिनीबाबत जुना वाद सुरू होता.

Talegaon : कुंडमाळा येथे वर्षाविहारासाठी आलेला तरुण गेला वाहून

दरम्यान पानसरे शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शेतातील मशागतीचे काम पाहण्यासाठी गेले होते. यावेळी पाच जणांनी मेहबूब पानसरे आणि इतर दोघांवर कुऱ्हाड आणि कोयत्याने वार केले.

मेबबुब पानसरे हे राष्ट्रवादीच्या खासदार आणि कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय मानले (Jejuri) जातात. मेहबुब पानसरे हे जेजुरीचे माजी नगरसेवक होते आणि प्रसिद्ध व्यापारी म्हणून ही त्यांचा लौकिक होता. मेहबुब पानसरे हे खंडोबा देवाचे मानकरी आणि निस्सिम भक्त होते सामाजिक कार्यात ते अग्रेसर होते. त्यांच्या पत्नीही माजी नगरसेविका आहेत. जेजुरी रेल्वे स्टेशन परिसरातून ते निवडून येत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.