Talegaon : कुंडमाळा येथे वर्षाविहारासाठी आलेला तरुण गेला वाहून

एमपीसी न्यूज – शेलारवाडी जवळ कुंडमळा येथे वर्षाविहारासाठी आलेला एक तरुण इंद्रायणी नदीत वाहून गेला. ही घटना शुक्रवारी (दि. 7) सायंकाळी सव्वा सहा वाजता (Talegaon) घडली.

ओमकार गायकवाड (रा. पिंपरी चिंचवड. मूळ रा. अहमदनगर) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओमकार गायकवाड हा त्याच्या एका मित्रासोबत शुक्रवारी कुंडमळा येथे वर्षाविहारासाठी आला होता. कुंडमळा येथे बंधाऱ्यावरील धोकादायक ठिकाणी ओमकार गेला. तिथून पाय घसरून तो नदीपात्रात पडला आणि वाहून गेला.

Chakan : चाकण तळेगाव रस्त्यावर अवतरली तळी; अनेक ठिकाणी धोकादायक खड्डे

ओमकार हा पिंपरी मधील टाटा मोटर्समध्ये काम करत होता. कुंडमळा येथे फिरायला आल्यानंतर त्याने त्याच्या मित्रासोबत अनेक (Talegaon) फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यातील काही व्हिडिओ पाण्यात उतरून देखील काढले.

मात्र बंधाऱ्यावर पाण्याचा प्रवाह अधिक असलेल्या धोकादायक ठिकाणी गेल्याने तो वाहून गेला. त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.