Chakan : चाकण तळेगाव रस्त्यावर अवतरली तळी; अनेक ठिकाणी धोकादायक खड्डे

एमपीसी न्यूज : चाकण -तळेगाव रस्त्यावर (Chakan)अनेक भागात पाऊस पडल्यानंतर  साचणारे पाणी वाहून जाण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. तळेगाव चौका जवळील अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.

मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये फक्त पाणी दिसत असल्यामुळे वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे या खड्ड्यातील पाण्यातून पुढे जाण्याच्या प्रयत्नातील वाहने त्यामुळे थेट खड्ड्यात आदळत आहेत. तळेगाव रस्त्यांवर वाहनचालकांना खड्डे चुकवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

चाकण तळेगाव चौकापासून पुढील भागात रस्त्यांवरच तळे साचत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध तर काही ठिकाणी रस्त्याच्या लगतच्या साईडपट्ट्या खूप खोल पर्यंत खचल्या आहेत.

चाकण ते खालुंब्रे दरम्यान अनेक ठिकाणी थेट रस्त्यावरच पाणी (Chakan) साचलेले असते. रस्त्यावर आणि रस्त्यालगत साचलेल्या पाण्यातून वाट काढत जाणे वाहन चालकांना कठीण होत आहे.

डांबरी रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने डांबराचे अस्तित्व नष्ट होऊन खड्ड्यांचे साम्राज्य पुन्हा निर्माण होत आहे.

नागरिक म्हणतात…

प्रत्येक वर्षी या रस्त्यावर अशीच स्थिती होते. यंदाही अनेक ठिकाणी रस्त्यात मोठाले खड्डे पासून त्यात पाणी साचले आहे.  रस्त्यावरील तळी पाऊस होऊन गेल्यानंतर पुढे काही दिवस तशीच राहतात. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असते.

प्रशासनाने रस्त्यांवर पाणी साचणारी ठिकाणे शोधून तेथे उपाययोजना करावी अशी वाहन चालक आणि परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

Pune : पोलिसांनी उधळला पेट्रोलपंप लुटण्याचा डाव; पाच जणांना अटक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.