Pune : पोलिसांनी उधळला पेट्रोलपंप लुटण्याचा डाव; पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज : लोहगाव-वाघोली रोडवरील पेट्रोलपंप लुटण्याचा (Pune) बेत उधळून लावत विमानतळ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. या आरोपींना पोलिसांच्या पथकाने गुरुवारी लोहगाव येथून अटक केली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना फॉरेस्ट पार्क-लोहगाव रस्त्यावर काही पुरुष लपून बसल्याची माहिती मिळाली होती. आरोपींकडे शस्त्रे होती. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून उमेश राम गायकवाड (वय 30), सूर्यकांत धोंडिबा रासगे ( वय 42), संतोष हरिदास गायकवाड ( वय 37), नितीन शंकर जाधव ( वय 29), शेखर सीताराम गायकवाड (वय 58) या पाच आरोपींना अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी चार मुंढवा येथील रहिवासी (Pune) आहेत, तर एक हडपसर येथील रहिवासी आहे. तपासादरम्यान आरोपींनी लोहगाव-वाघोली रोडवर असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा कट रचल्याची कबुली दिली.

 

भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 399 अन्वये विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Maharashtra : शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको – मुख्यमंत्री

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.