Nigdi News: सातव्या भक्ती-शक्ती सायक्लोथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – इन्डो अॅथलेटिक्स सोसायटीतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदा घेण्यात आलेल्या निगडी ते लोणावळा 100 किलोमीटर सायकलिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण भारतातून 1 हजार हून अधिक जणांनी सहभाग घेतला.

आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रामध्ये असणारी अग्रगण्य संस्था इन्डो अॅथलेटिक्स सोसायटी यांच्यामार्फत दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात येतो. सदर स्पर्धेचे यंदा सातवे वर्ष होते. सर्व सहभागी सायकल घेऊन सकाळी 5 वाजता भक्ती शक्ती निगडी येथे जमले होते. इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. विजय सातव, डॉ. दिलीप कामत, डॉ. सुहास माटे, उद्योजक अन्नारे बिरादार, आयएएस चे गजानन खैरे, गणेश भुजबळ, अजित पाटील, अमृता पाटील यांच्यातर्फे झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. भक्ती शक्ती सायक्लोथॉन दरवर्षी तीन प्रकारांमध्ये घेतली जाते. त्यात 20 किमी भक्ती शक्ती ते देहूरोड, 50 किमी भक्ती शक्ती ते कान्हे फाटा, 100 किमी भक्ती शक्ती ते लोणावळा.

जाती जोडून एकात्म भारतीय संस्कृती निर्माण करण्याची गरज – प्रा. डॉ. शरणकुमार लिंबाळे

पुणे, पिंपरी-चिंचवड,अहमदनगर, नारायणगाव, उदगीर, सोलापूर तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून सायकलप्रेमींनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अनाथ मुलांना शिकवणाऱ्या प्रियंका ताकवणे, निराधार संस्था कामशेत, कर्तव्य फाउंडेशन देहूगाव, मंचर फार्म तसेच पुणे टू कन्याकुमारी, पुणे टू हम्पी असा विविध राईट यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या अजय दरेकर, समीर जोशी, रविचंदन रमेश खाडे श्रेयस पाटील, प्रीती मस्के, स्वप्निल भुमकर, राघवेंद्र बेनाडे, निलेश जगताप महेश फुलमंटे अशा विविध सायकल प्रवास करणाऱ्या टींमचा सत्कार करण्यात आला.

भक्ती शक्ती सायक्लोथॉनच्या नियोजनामध्ये इंडो अॅथलेटिक्स सोसायटीच्या मोठ्या टीमचा सहभाग होता. त्यात गिरीराज उमरीकर , संदीप परदेशी, रमेश माने , सुधाकर टिळेकर, प्रमोद चिंचवडे , अविनाश चौगुले, श्रीराम पाटील, विवेक कडू, विशाल कोल्हे, अनुप कोहले, नारायण माधगुड, यादव बाळासाहेब , सुनील चाकू ,तुषार त्रिफळे, मनोज काशीद, प्रणय कडू, सुजित नाईक, रवी पाटील, संदीप लोहकर, अमित पवार, नितीन पवार, सुशील मोरे, रोहित जयसिंघानी , प्रशांत तायडे, सुजित मेनन, माधवन स्वामी, अभिनंदन कासार, मदन शिंदे, मारुती विधाते तर कपिल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रायोजकांमध्ये एबीसी इंडिया पेट्रोल पंप तळेगाव, जितेंद्र छलानी लोणावळा, एनप्रो इंडस्ट्रीज, मंचर फॉर्म यांचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.